केरळच्या विमान दुर्घटनेची एएआयबी करणार चौकशी

0

नवी दिल्ली : एअर इंडिया एक्‍स्प्रेसचे विमान केरळमधील कोझिकोडच्या करीपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताना धावपट्टीवरून घसरल्याची दुर्घटना शुक्रवारी घडली. या भीषण अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले अहेता. दुबईहून 191 प्रवाशांना घेऊन आलेल्या विमानात मुंबईतील वैमानिकासह 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 123 प्रवासी जखमी झाले. दरम्यान, या घटनेच्या तपासाचे आदेश केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी दिले. एअरक्राफ्ट ऍक्‍सिडेंट इन्वेस्टिगेशन ब्यूरो (AAIB) या घटनेचा तपास करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोझिकोडमध्ये झालेल्या विमान उपघाताचं दु:ख झालं आहे. AXB-1344 हे विमान 191 प्रवाशांसह दुबईवरून कोझीकोड या ठिकाणी येत होते. पावसामुळे हे विमान धावपट्टीवरून घसरले आणि विमानाचे तुकडे होण्यापूर्वी ते 35 फुट खाली गेले, अशी माहिती हरदीपसिंह पुरी यांनी दिली. तसेच आपण स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून मुंबई, दिल्लीवरून मदतीसाठी टीम रवाना करण्यात आल्या आहेत. एआयबीद्वारे या घटनेचा तपास केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

AXB-1344 हे विमान रात्री 7.41 वाजता कोझिकोडच्या करिपुर विमानतळावर उतरत असताना धावपट्टीवरून घसरले आणि खड्डयात कोसळले. हा अपघात एवढा भीषण होता की, विमानाचे दोन तुकडे झाले. विमानाने उतरताना धावपट्टी सोडली आणि ते कुंपणाच्या भिंतीवी आदळून 35 फुट खोल खड्डयात कोसळले. त्यामुळेच त्याचे दोन तुकडे झाले, अशी माहिती नागरी उड्डाण महासंचालनालयाने आपल्या निवेदनात दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.