चिखली : चिखली येथील केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चिखली तालुका आरोग्य अधिकारी यांना कोरोना लसीकरणासाठी शासकीय आरोग्य व महसूल कर्मचाऱ्यांसोबत केमिस्ट बांधवांना ही प्राधान्य देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे,
केमिस्ट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे की कोरोना महामारीच्या काळात सन्मुर्ण जग ठप्प असतांना सुद्धा शासकीय आरोग्य,महसूल कर्मचाऱ्यांसोबत सर्व केमिस्ट बांधव,भगिनी व सर्व दुकानातील कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आरोग्य व्यवस्थेतील महत्वाचा दुवा म्हणून औषधांचा पुरवठा अखंडितपणे सुरू ठेवलेला आहे व वेळोवेळी शासनाच्या निर्देशाप्रमाणे आपली आरोग्य सेवा अखंड सुरू ठेवलेली आहे.
पर्यायी शासनाच्या आरोग्य व्यवस्थेतील भार उचलण्याचे सहकार्य सर्व केमिस्ट बांधवांनी केलेले आहे तरी येणाऱ्या कोरोना लसीकरणासाठी शासकीय आरोग्य ,महसूल कर्मचाऱ्यांप्रमाणे केमिस्ट बांधव तसेच दुकानातील सर्व कर्मचारी व केमिस्ट परिवारातील सर्व सदश्यांना अग्रक्रमाने लसीकरण देण्याची मागणी केमिस्ट संघटनेने केली आहे याप्रसंगी बुलढाणा जिल्हा केमिस्ट संघटनेचे जॉईंट सेक्रेटरी प्रशांत ढोरे पाटील, जिल्हा सदस्य विनोद नागवानी,चिखली केमिस्ट संघटनेचे शहराध्यक्ष स्वप्नील तायडे,ई.सी.मेम्बर जयंत शर्मा,ई.सी.मेंम्बर सुनील पारस्कर उपाध्यक्ष बद्री पानगोळे,दीपक खरात, सचिव गजानन भुते,पिंटू वाहेकर,नंदीप वाघमारे आदी केमिस्ट पदाधिकारी उपस्थित होते.