केटामाइन प्रकरण : संशयितांना जास्तीत जास्त शिक्षा देण्याबाबत सरकारपक्षातर्फे युक्तीवाद

0

जळगाव – जळगावच्या रुखमा इंडस्ट्रीजमध्ये छापा टाकून 118 कोटी रुपये किंमतीचे केटामाइन या अंमली पदार्थाचा साठा मुंबई विभागातील डीआरआयच्या अधिकार्‍यांनी 14 डिसेंबर 2013 मध्ये जप्त केला होता. या प्रकरणी 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. खटल्यात जिल्हा न्यायालयाचे न्या. एस.जी.ठुबे यांनी 17 रोजी सात आरोपींना वेगवेगळ्या कलमान्वये दोषी धरले आहे. सोमवारी २२ रोजी संशयितांना जास्तीत जास्त शिक्षा देण्याबाबत सरकारपक्षातर्फे युक्तीवाद करण्यात आला. व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे संशयित न्यायालयात हजर होते. यादरम्यान न्या. ठुबे यांनी शिक्षेबाबत विचारणा करता संशयित विकास पुरी, रजनीश ठाकूर,एस.एम.शिंथीलकुमार या तिघांना रडू कोसळले होते. खटल्यात 26 रोजी निकालावर काम होणार आहे.

जळगाव औद्योगिक वसाहतीतील रुखमा इंडस्ट्रीज येथे छापा टाकून डीआरआय पथकाने 13 डिसेंबर 2013 रोजी मध्यरात्री छापा टाकून 1175 किलो केटामाइन जप्त केले. जागतिक बाजारपेठेत त्याची किंमत 118 कोटी रुपये आहे. याप्रकरणी वरूण कुमार तिवारी, गौरी प्रसाद पाल दोन्ही रा. विकरोली मुंबई, नित्यानंद थेवर (वय 27) रा. धारावी मुंबई, कांतीलाल उत्तम सोनवणे रा. जळगाव, जी. श्रीनिवास राव, विकास पुरी रा. पवई मुंबई, खेमा मधुकर झोपे रा. अंबरनाथ ठाणे, विकास रामकृष्ण चिंचोलो रा. जळगाव, नितीन चिंचोली रा. आदर्श नगर, रजनिश ठाकूर सिकंदराबाद, एस.एम.संथिककुमार मैलापूर, चेन्नई आणि विशाल सोमनाथ पुरी रा. जनकपुरी नवी मुंबई अशा 12 संशयित आरोपींवर नार्कोटिक ड्रग्स अ‍ॅण्ड सायकोट्राफिक सबस्टन्स अ‍ॅक्ट 1985 नुसार गुन्हा दाखल झाला होता.

पाच वर्षापासून जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या. एस.जी. ठुबे यांच्या न्यायालयात हा खटला सुरु आहे.

या खटल्यात सोमवारी निकालावर कामकाज झाले. यात अटकेतील संशयित व्हीडिओ कॉन्फरन्सने हजर होते. यात 44 साक्षीदार डीआरआयतर्फे तपासण्यात आले. यात न्या. ठुबे यांनी वरूणकुमार तिवारी, श्रीनिवास राव, विकास पुरी, खेमा मधुकर झोपे , नितीन चिंचोली, रजनिश ठाकूर, एस.एम.शिंथीलकुमार हे सातही संशयित जिल्हा कारागृहातून व्हिडीओ कान्फरन्सने हजर होते

Leave A Reply

Your email address will not be published.