केकतनिंभोरे येथील सभा मंडपाचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे

0

जामनेर (प्रतिनिधी):- तालुक्यातील केकतनिंभोरे येथे नुकतेच आमदार फंडातून गावासाठी सभा मंडप मंजूर झाले होते .या सभा मंडपाचे काम हे अतिशय संत गतीने होत असल्याने ग्रामस्थांनी नाराजी दर्शवली आहे .तसेच या बांधकामात दर्जाहीन काम होत असल्याचे मनसेचे उपजिल्हाध्यक्ष अशोक पाटील यांनी ग्रामसेवक व गावकर्यांच्या लक्षात आणून दिले असता ,त्यात प्रामुख्याने या सभा मनपाच्या पाया भरणी साठी चक्क काळी माती वापरली जात असून ती तात्काळ बाहेर काढण्याची मागणी पाटील यांनी केली आहे.
गावात असे सभा मंडप प्रथमच एकच होत असल्याने त्याचा दर्जा उत्तम व्हावा व गावातील लग्न व इतर समारंभ या ठिकाणी आनंदाने पार पाडावे.

त्यामुळे पाया भरणीचे काम उत्तम झाल्यास पुढील बांधकाम टिकेल. अशी ग्रामस्थांची भावना आहे. या सभा मंडप पाया भरणी साठी मुरूम वापरावा अशी मागणी अशोक पाटील यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.