केकतनिंभोरा दुषीत पाणीपुरवठा विरोधात ग्रामस्थांचा उपोषणाचा ईशारा

0

 जामनेर(प्रतिनिधी):-तालुक्यातील केकतनिंभोरा येथील ग्रामपंचायतीद्वारे गेल्या अनेक दिवसांपासुन गावाला दुषीत पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे,असंख्य ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारींची संबंधितांनी कोणतिही दखल घेतली नसल्याने येत्या सोमवार (२३) पासुन उपोषणाचा ईशारा देण्यात आला आहे.तशा आशयाचे निवेदन तहसिलदार अरुण शेवाळे यांना देण्यात आले. यापुर्वीही गावातील दुषीत पाणीपुरवठ्याबाबत तक्रार करण्यात आली होती,सुमारे ६३ लाखावर खर्चाच्या भारत निर्माण पेयजल योजना राबवीण्यात आली होती,तरीही केकतनिंभोरा हे गाव स्वच्छ पाणी पुरवठ्यापासुन वंचीत असल्याचे ग्रामस्थ व अशोक कृष्णा पाटील यांचे म्हणने आहे.गेल्या १६ डिसेंबरला झालेल्या ग्रामसभेतही स्वच्छ पाणी पुरवठ्याची मागणी करण्यात आली होती,मात्र अद्यापही त्यावर कारवाई नसल्याने नाईजास्तव उपोषणाचा पर्याय निवडण्यात आल्याचे पाटील यांनी सांगीतले.

Leave A Reply

Your email address will not be published.