केंद्र सरकारविरोधात आज कॉंग्रेसची “भारत बचाव रॅली”

0

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या नागरिकत्व सुधारणा विधेयक, महिलांवरील अत्याचार, आर्थिक मंदी आणि अन्य मुद्द्यावरुन कॉंग्रेसकडून आज भारत बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्लीच्या रामलीला मैदानावर कॉंग्रेसकडून मोदी सरकारच्या विरोधात ही भव्य रॅली काढण्यात येणार आहे. रॅलीच्या माध्यमातून केंद्र सरकारवर निशाणा साधणार आहे. रामलीला मैदानात आयोजित करण्यात आलेल्या रॅलीमुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. या रॅलीत कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह अन्य दिग्गज नेते सहभागी होणार आहेत.

रामलीला मैदानात कॉंग्रेसच्या या रॅलीसाठी भव्य पोस्टर्स लावण्यात आले आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह कॉंग्रेसचे सगळेच नेते या भव्य रॅलीला उपस्थित राहणार आहेत. तसेच देशाच्या प्रत्येक राज्यातून कॉंग्रेस कार्यकर्ते या रॅलीत सहभाग घेणार आहेत. यामध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी कार्यकर्त्यांना संबोधित करतील. नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात देशव्यापी आंदोलनाची घोषणा होण्याची शक्‍यता आहे. त्याचसोबत महिलांवरील अत्याचार असे अनेक मुद्दे घेऊन कॉंग्रेसने केंद्र सरकारविरोधात आक्रमक होण्याचा पवित्रा घेतला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.