केंद्र सरकारने महाराष्ट्राला पीएम केअर निधीमधून मदत द्यावी – संजय राऊतांची मागणी

0

 मुंबई | देशभरात कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत त्यात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहे. याच दरम्यान, केंद्र सरकारने महाराष्ट्राला पीएम केअर निधीमधून मदत द्यावी, अशी मागणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यसभेमध्ये केली आहे.

काल राज्यसभेमध्ये कोरोनाचा साथीच्या नियंत्रणाबाबत चर्चा झाली. त्यावेळी चर्चेत सहभागी झालेले शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी काही महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले. तसेच महाराष्ट्राला पीएम केअरमधून निधी देण्यात यावा अशी मागणी केली. त्याबरोबरच केंद्र सरकारकडे थकीत असलेला राज्याच्या वाट्याचा जीएसटीचा परतावा केंद्र सरकारने लवकरात लवकर द्यावा तसेच कोरोनाविरोधातील लढाईत कुणीही राजकारण आणू नये, असे आवाहन संजय राऊत यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.