Sunday, May 29, 2022

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी कथित अनुदगार काढल्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावरून राणे यांच्यावर कारवाईसाठी नाशिक पोलिसांचे एक पथक कोकणात रवाना झाले आहे.

- Advertisement -

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेदरम्यान अपशब्द वापरल्याबद्दल शिवसेनेचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी  सायबर पोलिस ठाणे मध्ये तक्रार दाखल केली असून पोलिसांनी भा द वि 500, 502, 505, 153, या कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी कारवाईसाठी पोलीस पथक तयार करून ते कोकणात रवाना केले आहे असं बडगुजर यांनी सांगितले.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या