Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»केंद्रीय निमलष्करी दलांमध्ये 10 उत्तीर्ण उमेदवारांना मोठी संधी
    ताज्या बातम्या

    केंद्रीय निमलष्करी दलांमध्ये 10 उत्तीर्ण उमेदवारांना मोठी संधी

    By March 17, 2021Updated:March 17, 20211 Comment0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    १० वी पास उमेदवारांना नोकरी मोठी संधी आहे. कर्मचारी चयन आयोग म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून केंद्रीय निमलष्करी पोलीस दलांमध्ये कॉन्स्टेबल भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. सीमा सुरक्षा बल (BSF), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF), केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF),इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस (ITBP), सशस्त सीमा बल (SSB),नॅशनल इनवेस्टिगेशन एजन्सी(NIA ) आणि सचिवालय सुरक्षा बल (SSF)आसाम रायफल्समधील भरती प्रक्रियेबाबत 25 मार्चला अधिकृत घोषणा होणार आहे. या भरतीसाठी 2 ऑगस्ट ते 25 ऑगस्टला ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा होईल.

    55 हजार पदांसाठी  निवड प्रक्रिया

    स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून जीडी कॉन्स्टेबल पदासाठी 55915 जागांवर भरती प्रक्रिया होणार आहे. त्यामध्ये 47582 जागा पुरुष उमेदवारांसाठी तर 8333 जागा महिला उमेदवारांसाठी ठेवण्यात आल्या आहेत. 2018 मध्ये 60210 मध्ये पदांसाठी भरतीची जाहिरात देण्यात आली होती. त्याचा निकाल जानेवारी 2021 मध्ये जाहीर झाला होता.

    10 वी उत्तीर्ण उमेदवारांना संंधी

    स्टाफ सिलेक्शन कमिशननं जाहीर केलेल्या परीक्षांच्या कॅलेंडरनुसार 10 मेपर्यंत जीडी कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करता येणार आहेत. 10 वी उत्तीर्ण उमेदवार या पदासाठी अर्ज करु शकतात. उमेदवारांची निवड कॉम्प्युटर आधारित टेस्ट, शारीरीक क्षमता, मेडिकल टेस्ट याच्या आधारावर केली जाणार आहे.

    पात्रता : कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करणारा उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

    वयोमर्यादा : वय 18 ते 23 च्या दरम्यान असणं आवश्यक आहे.

    अभ्यास क्रम : ऑनलाईन परीक्षेमध्ये सामान्यज्ञान, गणित, हिंदी आणि इंग्रजी, तार्किक क्षमता याविषयी प्रश्न विचारले जातात.

    परीक्षा शुल्क : यासाठी खुल्या प्रवर्गासाठी 100 रुपये परीक्षा फी आहे. तर, महिला, एससी, एसटी आणि माजी सैनिकांसाठी कोणतीही फी नाही.

    उमदेवार https://ssc.nic.in/SSCFileServer/Portal Management/UploadedFile या लिकंवर जाऊन अधिक माहिती जाणून घेऊ शकतात. तिथे निमलष्करी दल निहाय अधिकृत नोटिफिकेशन पाहू शकता.

    वेतन : जीडी कॉन्स्टेबल पदासाठी 21700-69100 इतक वेतन दिलं जाते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    दहावीच्या निकालात तांत्रिक गोंधळामुळे कायम

    May 11, 2026

    आंब्यांच्या ‘मॅंगो फिएस्टा’ प्रदर्शनाचे अशोक जैन यांच्या हस्ते उद्घाटन उत्साहात

    May 8, 2026

    पाय घसरुन विहिरीत पडल्याने बालकाचा मृत्यू

    May 8, 2026

    1 Comment

    1. Tejaswini Brijalal Mahajan on March 17, 2021 7:55 pm

      Iokshahi

      Reply
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif