चाळीसगाव :- सध्या महाराष्ट्रात भीषण पाणीटंचाई व चाराटंचाईचा सामना करावा लागत आहे. अशा टंचाईमध्ये तालुक्यातील कृष्णापुरी तांडा येथे चारा जळून खाक झाल्याची घटना नुकतीच घडली. दुष्काळी परिस्थितीत सुमारे २५ हजार रुपयाचा चारा जळाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या आगीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.
कृष्णापुरी तांडा येथील पदमसिंग जाधव यांच्या चार्याबरोबर गोरा देखील या आगीत जखमी झाला आहे. घटनास्थळी तहसीलदार अमोल मोरे यांनी भेट देऊन पाहणी केली. तलाटी श्रीमती सोनवणे यांनी पंचनामा केला. लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी श्री जाधव यांनी केली आहे.