कृषी पदवीधर युवा संघटनेच्या तालुकाअध्यक्ष पदी शुभम पाटील

0

बोदवड (प्रतिनिधी) :– महाराष्ट्र राज्य कृषी पदवीधर संघटनेच्या बोदवड तालुकाध्यक्षपदी बोदवड येथील शुभम ज्ञानेश्वर पाटील यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.या नियुक्तीबाबतचे नियुक्तीपत्र संघटनेचे अध्यक्ष जयदिप ननावरे यांच्या हस्ते त्यांना देण्यात आले आहे.

देण्यात आलेली ही जबाबदारी आपण स्वयंस्फूतीने पार पाडावी व तालुक्यातील कृषी पदवीधर मित्र आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करावी तसेच पुढिल संघटनेचे विविध उपक्रम तालुक्यात राबवावे अशी आशा व्यक्त करीत पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.