Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतरच्या नावाखाली महिलेवर जबरदस्ती अत्याचार
    • उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात नागपंचमीनिमित्त प्रचंड गर्दी
    • शुल्लक कारणावरून अपहरण करत बेदम मारहाण
    • मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक
    • बापरे! शाळकरी मुले थोडक्यात बचावली!
    • नाशिक जिल्ह्यात पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के
    • माजी महामंत्री विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी
    • अखेर नाशिक, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»कृषी»कृषि समृद्धी योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन
    कृषी

    कृषि समृद्धी योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 2, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    कृषि समृद्धी योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

    जळगाव लोकशाही न्यूज नेटवर्क I कृषि समृद्धी योजनेंतर्गत सन २०२५-२६ पासून शेतकऱ्यांसाठी कृषि यांत्रिकीकरण घटकात मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होणार आहे. या अनुषंगाने कृषि विभागाने महाडीबीटी पोर्टलवर “शेतकरी योजना” या सदराखाली एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केली असून, शेतकऱ्यांना अर्ज एक, योजना अनेक या तत्त्वावर लाभ मिळणार आहे.

    या प्रणालीद्वारे कृषि यांत्रिकीकरण उप-अभियान, राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण योजना, राष्ट्रीय कृषि विकास योजना यासह ट्रॅक्टर, पॉवर टिलर, ट्रॅक्टर चलित औजारे, पिक संरक्षण औजारे, मनुष्यचलित औजारे, स्वयं चलित औजारे, किसान ड्रोन व औजारे बँक इत्यादींचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे. शेतकऱ्यांना आपल्या गरजेनुसार बाबी निवडण्याचे स्वातंत्र्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.

    योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID) असणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलच्या https://mahadbtmahait.gov.in/ या संकेतस्थळावर भेट देऊन ‘शेतकरी योजना’ हा पर्याय निवडावा. मोबाईल, संगणक/लॅपटॉप/टॅबलेट, सीएससी केंद्रे, ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र अशा विविध माध्यमांतून अर्ज दाखल करता येणार आहे.

    नोंदणीकृत अर्जांची छाननी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर होणार असून, ऑनलाईन लॉटरी, पूर्व संमती, मोका तपासणी आणि निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट अनुदान जमा करण्यापर्यंत सर्व प्रक्रिया ऑनलाईन पार पडणार आहे.

    ज्या शेतकरी बांधवांनी अद्याप महाडीबीटी पोर्टलवर कृषि यांत्रिकीकरण योजनेसाठी अर्ज केलेला नाही, त्यांनी तातडीने अर्ज भरावेत, असे आवाहन जिल्हा अधिकक्ष कृषि अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

    #farmers Agriculture maharashtra shasan MHA dbt portal कृषी महाडीबीटी पोर्टल महाराष्ट्र शासन शेतकरी
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    फुलगावसह पिंपळगाव येथे दोघांची आत्महत्या

    August 17, 2026

    मुलींना जन्मापासून 18 वर्षांपर्यंत मिळणार रु. 1.01 लाख

    August 16, 2026

    अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

    August 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif