कृषि पदवीधर संघटना युवती आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदी कु.नेहा पांडे यांची नियुक्ती

0

वरखेडी, ता. पाचोरा (वार्ताहार)- १६ जून रोजी कृषि पदवीधर संघटनेने राज्यातील कृषि व संलग्न पदवीधर आणि शेतकरी बांधवांचे संघटन करत असतानाच युवती आघाडी कृषि कन्यां साठी स्थापन केली आहे. कृषि पदवीधर च्या कोअर कमिटी मधील मंगल कडूस पाटील यांच्या अनुमोदना नंतर कु. गुंजन कुरकुरे यांचे नाव उत्तर महाराष्ट्र युवती प्रदेशाध्यक्ष म्हणून निश्चित करण्यात तर जळगाव जिल्हा युवती अध्यक्ष पदी कु नेहा पांडे यांची नियुक्ती करण्यात आली
राज्यातील कृषि विद्यार्थी संघटीत करत असताना युवती विद्यार्थीनी यांचे प्रश्न दुर्लक्षित करुन चालणार नाही, त्यांना संघटीत केले पाहिजे. कृषि कन्या संघटीत होण्याची ही राज्यात पहीली वेळ आहे, जळगाव जिल्हा पातळीवर मी युवती संघटीत करुन जिल्हातील कृषि विद्यालयातील युवतींचे प्रश्न जाणून घेण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे नवनिर्वाचित जिल्हा युवती अध्यक्ष नेहा पांडे यांनी सांगितले आहे.

कृषी पदवीधर संघटना ही शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या मुलांसाठी काम करत आहे आणि शेतकर्यांची कोणतीही अडचण आम्ही या संघटने मधून सोडविण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू असे आश्वासन संघटनेने दिले आहे.

युवती आघाडी ही संकल्पना सौ मंगल कडूस पाटील यांनी मांडली असुन, संघटनेच्या सौ भाग्यश्री ताई पाटील, सौ लक्ष्मी ताई मोरे अशा महीला कृषि उद्योजकांच्या माध्यमातून फक्त संघटनच नाही तर महीला भगिनी च्या करिअर ला नवी झळाळी देण्या साठी कृषि पदवीधर संघटना ची युवती आघाडी ही उपक्रम शील संघटन असणार आहे अशी माहिती भावना गायके कोअर कमिटी व उत्तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गुंजन कुरकुरे सदस्य यांनी दिली.

जळगाव जिल्हा अध्यक्षपदी नेहा पांडे यांची नियुक्त झाल्या बद्दल उत्तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गुंजन कुरकुरे ,चोपडा अध्यक्ष काजल पाटील , यांनी आभिंनदन केले यांची निवड उतर महाराष्ट्र पटलीवरील पदधिकरी यांचा सन्मान करण्यात येणार आल्याचे भावना गायके यांनी संगितले कृषिकन्या चे हे संघटन आला कृषि क्षेत्रातील चर्चे चा विषय ठरतो आहे

Leave A Reply

Your email address will not be published.