Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या
    • आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन
    • स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन
    • हल्ल्यानंतर विद्यानंद बापटांनी स्पष्ट केली मोठी भूमिका
    • उज्बेकिस्तानमधून सांगण्यापेक्षा देशात पत्रकार परिषद घ्या!
    • विमानाची पार्किंगदरम्यान खांबाला जोरदार धडक
    • बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!
    • अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; त्या नराधम शिक्षकास अद्दल घडवा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»कृषि पदवीधर संघटना युवती आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी गुंजन कुरकुरे
    जळगाव

    कृषि पदवीधर संघटना युवती आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी गुंजन कुरकुरे

    By June 24, 2020No Comments3 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    वरखेडी, ता. पाचोरा : १६ जून रोजी कृषि पदवीधर संघटनेने राज्यातील कृषि व संलग्न पदवीधर आणि शेतकरी बांधवांचे संघटन करत असतानाच युवती आघाडी कृषि कन्यां साठी स्थापन केली आहे. कृषि पदवीधर च्या कोअर कमिटी मधील मंगल कडूस पाटील यांच्या अनुमोदना नंतर कु. गुंजन कुरकुरे सावदा यांची उत्तर महाराष्ट्र युवती प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आले आहे.

    राज्यातील कृषि विद्यार्थी संघटीत करत असताना युवती विद्यार्थीनी यांचे प्रश्न दुर्लक्षित करुन चालणार नाही, त्यांना संघटीत केले पाहिजे. कृषि कन्या संघटीत होण्याची ही राज्यात पहीली वेळ आहे. उत्तर महाराष्ट्र पातळीवर मी युवती संघटीत करुन महाराष्ट्रातील प्रत्येक कृषि महाविद्यालयातील युवतींचे प्रश्न जाणून घेण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे नवनिर्वाचित युवती अध्यक्ष गुंजन कुरकुरे यांनी सांगितले आहे. कृषी पदवीधर संघटना ही शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या मुलांसाठी काम करत आहे आणि शेतकर्यांची कोणतीही अडचण आम्ही या संघटनेमधून सोडविण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू असे आश्वासन संघटनेने दिले आहे.

    युवतीआघाडी ही संकल्पना सौ मंगल कडूस पाटील यांनी मांडली असुन, संघटनेच्या सौ भाग्यश्री ताई पाटील,  लक्ष्मी मोरे अशा महीला कृषि उद्योजकांच्या माध्यमातून फक्त संघटनच नाही तर महीला भगिनी च्या करिअरला नवी झळाळी देण्यासाठी कृषि पदवीधर संघटनाची युवती आघाडी ही उपक्रम शील संघटन असणार आहे, अशी माहिती भावना गायके कोअर कमिटी सदस्य यांनी दिली.जळगाव जिल्हा अध्यक्ष नेहा पांडे व इतर पदाधिकारी संजीवनी भालेराव, भावना ओतरी, तेजस्विनी पाटील आणि चोपडा अध्यक्ष काजल पाटील यांची निवड उत्तर महाराष्ट्र विभाग पातळीवरील पदाधिकारी म्हणून झाली आहे. पुणे येथील आगामी युवती सोहळ्यात सर्व पदाधिकारी यांचा सन्मान करण्यात येणार असल्याचे भावना गायके यांनी सांगितले. कृषि कन्या चे हे संघटन आता कृषि क्षेत्रातील चर्चे चा विषय ठरतो आहे. तसेच वरील निवडी बद्दल सर्वांचे आभिनंदन होत आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन

    September 4, 2026

    बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!

    September 4, 2026

    यावलच्या सोनाली तायडे यांचा बेस्ट बिझनेस अँड ब्युटी आर्टिस्ट अवॉर्डने सन्मान

    September 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif