कृतीयुक्त व दर्जेदार शिक्षण ही काळाची गरज :- पी.टी.पाटील.

0

जामनेर :- कृतीयुक्त व दर्जेदार शिक्षण ही आजच्या आधुनिक काळाची गरज आहे असे प्रतिपादन तालुक्यातील पहूर येथील संतोषी मातानगर जिल्हा परिषद शाळेचे ग्रेडेड मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांनी जामनेर शहरातील कला व वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राध्यापक विजयेंद्र पाटील यांच्या निवासस्थानी सत्कार कार्यक्रम प्रसंगी केले.प्रा.विजयेंद्र पाटील यांनी त्यांचा मुलगा थारंग यास कोदोलीच्या जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतल्याबद्दल त्यांचा सत्कार यावेळी शिक्षणप्रेमी शिक्षकांनी आयोजीत केला होता त्यावेळी पी.टी.पाटील बोलत होते.त्यांनी बोलतांना सांगितले की,आजच्या स्पर्धेच्या युगात काही जाणकार पालक प्रत्यक्ष अनुभवातून आपल्या पाल्याच्या भविष्याचा विचार करून योग्य निर्णय घेतात.म्हणून प्रा.विजयेंद्र पाटील यांनी आपल्या मुलाचा प्रवेश जि.प.कोदोलीच्या प्राथमिक शाळेत घेतला.अश्या अनुभवी व जि.प.शाळेचे महत्व समजणाऱ्या जाणकार पालकांमुळे निश्चीतच जि.प.च्या शाळांना चांगले वैभव प्राप्त होईल.यावेळी टाकळी केंद्राचे केंद्रप्रमुख डी.डी.घ्यार यांनी सांगितले की,प्रा.विजयेंद्र पाटील यांनी जि.प.शाळेचे महत्व जाणून आपल्या मुलाचे नाव जि.प.च्या शाळेत दाखल केले ही आदर्श व गौरवास्पद अशी बाब आहे.या अभिमानास्पद अश्या गोष्टीचा पालक निश्चीतच विचार करतील व जि.प.च्या शाळेत आपल्या पाल्यांचे नाव दाखल करतील.त्यामुळे विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढेल.सरांनी तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात आदर्श निर्माण केला आहे.

सत्काराला उत्तर देतांना प्रा. विजयेंद्र पाटील म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रत्यक्ष कृतीयुक्त शिक्षण दिले जाते तसेच विद्यार्थी हित जोपासले जाते. म्हणून माझ्या मुलाचा प्रवेश जि.प.शाळेत घेतला.यावेळी थारंगचे आजोबा तथा पंचायत समीतीचे माजी सदस्य व सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक व्ही.पी.पाटील यांनी सांगितले की,कोदोलीची जि.प.शाळा ही जिल्ह़्यात दर्जेदार शिक्षण देणारी आदर्श शाळा बनवण्याचा मानस आहे.त्यासाठी स्वत:पासून सुरुवात केली.यावेळी उपस्थित शिक्षकांनी थारंग तसेच आजी सुषमा पाटील,आजोबा व्ही.पी. पाटील व वडील विजयेंद्र पाटील यांचा सत्कार शाल व गुलाबपुष्प देवून केला.कार्यक्रमास शेंदुर्णी माध्यमिक शाळेच उपशिक्षक दत्तात्रय माळी,तळेगाव जि.प. शाळेचे उपशिक्षक शांताराम पाटील तसेच आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.