Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!
    • ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप
    • जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू
    • इंधन बचतीसाठी महापौरांकडून टू व्हीलर वापरायला सुरुवात!
    • जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी
    • कर्मचारी नाही, तुम्हीच येवून माहिती शोधा!
    • सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण!
    • आरोहण स्नेहसंमेलनाचा उत्साहात समारोप
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»कु-हा-काकोडा परिसरात वीज चोरट्यांशी महावितरणच्या अधिका-यांची हात मिळवणी?
    जळगाव

    कु-हा-काकोडा परिसरात वीज चोरट्यांशी महावितरणच्या अधिका-यांची हात मिळवणी?

    By March 16, 2020No Comments3 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बोदवड (प्रतिनिधी)- मुक्ताईनगर तालुक्यातील कु-हा काकोडा परिसरात गेल्या काही दिवसांपासून महावितरणाचे जबाबदार अधिकारी वीजचोरांना पडद्यामागून मदत करीत असलेल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून येथील अँक्वा प्लांट धारकांशी महावितरणचे अधिकारी हातमिळवणी करून शासनाची फसवणुक करीत असल्याचा धक्कादायक प्रकार माहिती अधिकारातून उघडकीस आला आहे.

    त्यामुळे येथे सुरु असलेल्या विज चोरीमुळे महावितरणाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असून यात सहभागी असलेल्या भ्रष्ट अधिका-यांची आर्थिक स्थिती भक्कम होत आहे.गेल्या मागील महिन्यात बोदवड येथील माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी कु-हा काकोडा परिसरातील अँक्वा प्लांट धारकांना देण्यात आलेल्या वीजबिलांमधील मोठी तफावत,तसेच वीजचोरी प्रकरणी काहींवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती मिळवली असून मात्र आजही परिस्थिती ‘जैसे थे तेच आहे’.त्यामुळे या वीजचोरांवर कारवाई करण्यात महावितरणचे अधिकारी अपयशी ठरत असल्याचे म्हटले जात असून येथे ‘कुपणचं शेत खात’ असल्याची म्हण लागू पडत आहे.त्यामुळे ह्या वीजचोरांना छूप्या पध्दतीने मदत करणारे ते भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी कोण?असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

    गेल्या काही दिवसापुर्वी महावितरणाचे विजचोरी प्रकरणी काहींवर कारवाई केली होती.मात्र आर्थिकहित साधत ही कारवाई कागदावरचं राहिल्याचे बोलले जात असून आज रोजी त्यातील काहींना व्यावसायिक वीजबील न देता घरगुती वापरा प्रमाणे तसेच अल्प वीजबील दराने वीजबील येत असल्याचा धक्कादायक प्रकार सुध्दा उघडकीस आला आहे.

    येथील अँक्वा प्लांट धारकांना येत असलेल्या वीजबिलांनी तफावत पाहता,तसेच करण्यात आलेली वीजचोरीची कारवाई कागदावर आहे.याकडे महावितरणाचे दुर्लक्ष होत असून या वीजचोरी प्रकरणात काही अधिका-यांचे आर्थिक साटेलोटे तर नाही ना? व ते आर्थिक रसद घेत असलेले अधिकारी व कर्मचारी कोण? अशी परिसरात चर्चा रंगत आहे.

    याकडे महावितरणच्या वरिष्ठ अधिका-यांनी तातडीने लक्ष घालून ते संबंधित अधिकारी व वीजचोरांच्या मिलीभगतीचा भांडाफोड करणे गरजेचे आहे.

    व यातील संबधित दोषींना शोधून त्यांची रवानगी आरोपींच्या पिंज-यात करून धडक कारवाई करावी व त्यांचे विरूध्द निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी होत आहे. संबधितांवर कारवाई झाल्यास येथे सुरु असलेल्या या शासनाच्या फसवणुकीच्या खेळामुळे शासनाची फसवणूक होणार नाही याची काळजी घेणे वरिष्ठांनी गरजेचे आहे.

    यामुळे वरिष्ठांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास गेल्या अनेक दिवसांपासून आर्थिक मलिदा लाटून आर्थिकस्थिती भक्कम करू पाहत असलेले अधिकारी व कर्मचारी तसेच वीजचोराना पाठबळ देत असलेल्या इतरांचाही खरा चेहरा समोर येईल यात शंका नाही.त्यामुळे महाविरणाच्या वरिष्ठ अधिका-यांकडून भविष्यात करण्यात येणा-या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!

    May 16, 2026

    ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप

    May 16, 2026

    जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

    May 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif