Wednesday, August 17, 2022

कुस्ती क्षेत्राच्या विकासासाठी शासन स्तरावर प्रयत्न झाले पाहिजेत -किसनराव जोर्वेकर

- Advertisement -

चाळीसगाव, लोकशाही न्युज नेटवर्क

- Advertisement -

जिल्ह्यातील  नामांकित कुस्तीगीरामधून महाराष्ट्र केसरी २०२१ साठी ज्यांची निवड झाली आहे, अशा नामांकित कुस्तीगीरांचा सत्कार समारंभ  येथील अण्णा कोळी पहीलवान माजी उपनगराध्यक्ष यांच्या अण्णासाहेब कोळी व्यायाम शाळातर्फे  नुकताच संपन्न झाला.

- Advertisement -

- Advertisement -

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी टाकळी ग्राम पंचायतीचे उपसरपंच व महाराष्ट्र राज्य परीट सेवा मंडळाचे राज्यउपाध्यक्ष  किसनराव जोर्वेकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, अण्णा पहीलवान यांनी आयोजित केलेला कुस्ती गिरांचा सत्काराचा कार्यक्रम हा अत्यंत स्तुत्य आहे, कुस्ती गिरांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी असे कार्यक्रम आयोजित केले पाहिजे तसेच पहीलवानांनसाठी  शासन स्तरावरुन पाहिजे. त्या सवलती मिळत नसल्याने चांगले मल्ल तयार होण्यास अनेक अडचणीना कुस्तीगीरांना तोंड द्यावे लागते.  कारण कुस्तीगीर पहीवान हा सर्व सामान्य गरीब कुटुंबातील असतो अनेक अडचणीना तोंड देऊन परीस्थिती नसतांना त्यांना कुस्तीची आवड असल्याने तो लहानपणापासूनच मल्ल कुस्तीगीर क्षेत्राकडे  वळलो परंतु शासन स्तरावर त्यांना काही सवलती व मदत मिळत नाही.  जर शासकीय मदत मिळाली तर जिल्ह्यातून चांगले मल्ल तयार होतील विशेष म्हणजे ग्रामीण भागातील तरून कुस्ती क्षेत्राकडे जास्त वळतात तर कुस्तीगीर क्षेत्र बळकट करण्यासाठी शासनाने व समाजाने एकत्र येण्याची  गरज असल्याचे जोर्वेकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले.

जिल्ह्यातून आलेल्या सर्व  पहीलवानांचा व महाराष्ट्र केसरी म्हणून निवड झालेल्या सर्वांचा  सत्कार अण्णा कोळी पहीलवान यांचे हस्ते संपन्न झाला. प्रारंभी  कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषणात अण्णा कोळी यांनी सांगितले की, पहीलवान हा कोणत्याही पक्षाचा नसतो, त्याला जातपात, पक्षभेद नसतो, सर्व सामान्य गरीब कुटुंबातील व्यक्ती असते त्यांची आवड फक्त कुस्ती क्षेत्राकडे असते. राजकारणात पहीलवांनाना काहीच घेणं देणं नसते तर शासनाने व समाजाने या क्षेत्राकडे अधिक लक्ष दिले तर महाराष्ट्रातून अनेक चांगले मल्ल तयार होण्यास मदत होईल.  मला लहानपणापासून  कुस्तीची आवड आहे.

चाळीसगाव तालुक्याचे  कुस्ती क्षेत्रात राज्यभर आहे.  तालुक्यातील सायगाव येथील विजय चौधरी हे ट्रिपल महाराष्ट्र केसरी आज डीवाय एसपी पदावर पुणे येथे कार्यरत आहे त्यांचा सारखा अभिमानआहे.  तसेच मी कोणत्या राजकीय पक्षांचा बांधलेला नाही जे चांगले काम करीतील त्यांच्या पाठीशी राहील व त्यांना मदत करणार पक्षभेद पहीलवांना जवळ कधीच नसतो.  कुस्तीगीरांचे मनोबल उंचावले पाहिजे  यांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांचे मानसिक बळ वाढवण्यासाठी हा छोटा खानी सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्याचा प्रयत्न केला असल्याचेही अण्णा कोळी पहीलवान यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाघडू गावचे तरुण तडफदार नेतृत्व व सेवानिवृत्त पोलिस हवालदार आबा भास्कर पाटील यांनी केले. त्यांनी मनोगतातून सांगितले की, पहीलवानांना येणाऱ्या अडीअडचणी व सत्य वास्तव यांचं विश्लेषण अत्यंत प्रभावीपणे केले.  ग्रामीण भागातील तरुण हा कुस्ती क्षेत्राकडे कसा वळतो.  त्यांना येणाऱ्या  अडचणी या बाबत उहापोह केला.  आता यापुढे कुस्तीगीरांना चांगले दिवस येतील परंतु शासनाने व समाजाने त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत असे आबा पाटील यांनी आपल्या मनोगतातून सांगितले.

कार्यक्रमला जिल्ह्याभरातून  आलेल्या सर्व पहीलवानांचा योथोचीत शाल श्रीफळ हार गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे माजी जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम मामा कोळी, चाळीसगाव न. पा. चे माजी उपनगराध्यक्ष शिवाजी अप्पा राजपूत, नगरसेवक सुरेश अण्णा चौधरी, पत्रकार मित्र मंडळाचे सचिव एम. बी. पाटील सर, उद्योगपती मोरसिंग राठोड, वाकडीचे महाराष्ट्र केसरी अतुल पहीलवान यांचे पिताश्री रावसाहेब पहीलवान, वाघडूचे आबा पाटील, अँड आगोणे, पत्रकार अजीज खाटीक, पंचायत समिती सदस्य सुभाष पाटील, विभागीय अध्यक्ष धर्मराज पाटील, चर्मकार संघाचे अध्यक्ष भानुदास विसावे, रेल्वे स्थानक पोलिस उपनिरीक्षक शब्बीर खाटीक, अशोक पहेलवान  यांच्यासह  जिल्ह्यातील नामांकित पहीलवान आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.  चाळीसगाव तालुक्यासह जिल्हाभरात मोठ्या प्रमाणावर पहीलवानांची उपस्थित होती.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या