जळगाव | अजिंठा चौफुली येथे हातगाडीवर कुल्फी विक्री करणाऱ्याने कुल्फीचे पैसे मागितल्याचा राग आल्याने, चार तरुणांनी त्याला बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. नयन अनिल भदाणे (रा.कासमवाडी) असे जखमी विक्रेत्याचे नाव आहे.
इरफान खान उर्फ इल्लू याच्यासह इतर ३ तरुण कुल्फी खाण्यासाठी आले. नयन याने कुल्फीचे पैसे मगितल्याचा राग आल्याने आम्ही या एरियाचे दादा आहे म्हणत चौघांनी नयनला मारहाण केली. चौघांनी नयन याच्यासह त्याचा मावस भाऊ लोकेश अरुण वाणी व मावसा अरुण पांडुरंग वाणी यांच्यावर दगडफेक केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला.