जळगाव ;- उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी भवनाजवळ सुरु करण्यात आलेल्या पाणपोईचे उद्घाटन कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या हस्ते झाले.
यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, डॉ.एस.टी.इंगळे, प्राचार्य डॉ.ज्ञानेश्वर सुर्यवंशी, दीपक पाटील, प्रा.नितीन बारी, कुलसचिव भ.भा.पाटील, क्रीडा संचालक डॉ.दिनेश पाटील, कार्यकारी अभियंता सी. टी. पाटील, विद्यापीठ उपअभियंता एस.आर.पाटील, रमेश शिंदे उपस्थित होते.