जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्रविद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या नावेबनावट व्हॉटसअप अकाउंट तयार करण्यात आले असूनयाबाबत नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या नावाने
बनावट व्हॉटसअप अकाउंट तयार करण्यात आले असूनत्यावर प्रा. माहेश्वरी यांचा फोटो आहे. वास्तविक हा क्रमांक प्रा. माहेश्वरी यांचा नाही. या क्रमांकावरून काही संदेशआल्यास अथवा पैशाची मागणी झाल्यास कोणत्याही प्रकारे पैसे पाठवू नये असे आवाहन या निवेदनाद्वारे करण्यात येत आहे. याबाबतीत पोलिसांकडे तक्रार अर्ज देण्यात आला आहे.