कुऱ्हे पानाचे येथे शेतकऱ्यावर रानडुकराने केला हल्ला

0

भुसावळ ;- तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील शेतकऱ्यावर रानडुकराने हल्ला केल्याची घटना घडली असून यात शेतकरी गंभीर जखमी झाला आहे . त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत . दरम्यान हिंस्त्र प्राण्यांचे हल्ले होण्याच्या घटना अलीकडे वाढल्या आहे .
याबाबत माहीत अशी कि ,कुऱ्हे पानाचे येथील दिनेश देवचंद गांधेले या शेतकऱ्यावर रानडुकराने प्राणघातक हल्ला केल्याने शेतकरी गंभीर जखमी झाला आहे त्याच्यावर भुसावळ येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे .ही घटना सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास चौरंगीनाथ मंदिराच्या मागे घडली. दरम्यान ,जामनेर- भुसावळ रस्त्यावर गेल्या तीन महिन्यापूर्वी ममोटरसायकलला निल गाईने धडक दिल्यानंतर एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता .जंगली प्राण्यांचा हौदोस. वाढला असून वन विभागाचे मात्र याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे .त्यामुळे शेतकरी वर्गात तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे

Leave A Reply

Your email address will not be published.