कुऱ्हा काकोडा येथे धावण्याची स्पर्धा

0

कुऱ्हा काकोडा, वार्ताहर –  येथील प.पू. माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी सार्व.संस्थे द्वारा स्व.अशोक फडके (बाबासाहेब फडके) यांच्या पुण्यतिथी निमित्त भव्य तालुकास्तरीय शालेय मैदानी 100 मी.धावणे स्पर्धा घेण्यात आली.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रमोद शिवलकर, उपाध्यक्ष तथा बेटी बचाओ बेटी पढाओचे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके, सचिव भालचंद्र कुलकर्णी, कोषाध्यक्ष पूरनमल चौधरी, श्री.बढे सर, दामोदर सुरांगे, प्रभाकर सुशिर, निवृत्ती पाटील, सीताराम तावरी,  वासुदेव पाटील तसेच सर्व शिक्षक शिक्षिका, प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी सर्व विद्यार्थी उपस्थित होते. स्पर्धा आटोपल्या नंतर  मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा पार पडला.

Leave A Reply

Your email address will not be published.