पाचोरा (प्रतिनिधी) : शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे. हे तिसरे नेत्र माणसाजवळ नसले तर तो मरे पर्यंत त्या वाचून आधंळा राहतो. ज्यांनी त्या शाळेत शिक्षण घेतले त्यांनीच काही उपद्व्याप करून शिक्षणाचे मंदिर समजल्या जाणाऱ्या शाळेत अवैध दारू पिऊन धिंगाणा घातला व शाळेची किरकोळ नुकसान केल्याचे समोर आले आहे.
तर ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच व सदस्य यांनी शिक्षकांसमवेत पाहणी केली तर शाळेच्या आवारात जिकडे -तिकडे दारूच्या बाटल्या, बियर च्या बाटल्या, प्लास्टीक ग्लास, पाणी बाटल असे मोठ्या प्रमाणावर आढळून आले. यावेळी सरपंच पती गणेश संतोष पाटील, उपसरपंच शालिग्राम बाजीराव पाटील, सदस्य योगेश शांताराम पाटील, नगराज पाटील, पंढरीनाथ पाटील यांच्या समवेत माध्यमिक शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. यापुढे तेथे कोणी असे गैरकृत्य करतांना आढळून आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे ही यावेळी उपस्थितांनी सांगितले आहे.