भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
भडगाव येथे कुत्र्याला हकलण्याच्या कारणावरुन महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी पाच जणांवर भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील एका भागात ३६ वर्षीय महिला आपल्या कुटुंबीयांसह राहते. काल सोमवार १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास कुत्र्याला हाड हाड केल्याच्या कारणावरून घरासमोर राहणाऱ्या रविंद्र सुरेश सोनवणे, अरुण पांडुरंग पिंपळे, पांडुरंग शंकर पिंपळे, राहुल सुरेश मालचे, सुनील त्र्यंबक सोनवणे सर्व रा. भडगाव यांनी सदरील महिलेला शिवीगाळ करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य विनयभंग केला.
तिच्या गळ्यातील सोन्याची पोत तोडून नुकसान केल्याची घटना घडली. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस ठाण्यात ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ किरण ब्राह्मे करीत आहे.