भातखंडे (प्रतिनिधी) : २३ एप्रिल म्हणजे जागतिक इंग्लिश दिवस . इंग्रजीतल्या थोर साहित्यक विल्यम शेक्स्पेअरचा जन्मदिवस अन मृत्य दिन सुद्धा या दिवशी महाराष्ट्र बँकेच्या कनिष्ठ लिपिक पदावर असलेल्या सौ सुवर्णा भदाणे यांनी त्याच्या आठवणीत हा दिवस जागतिक इंग्रजी दिवस म्हणून UK मध्ये UNESCO मार्फत २०१० पासून साजरा केला जातो याबाबत सविस्तर कथन केले. इंग्रजी हि जगातली सगळ्यात जास्त बोलली जाणारी तिसरी भाषा आहे . आपल्याकडे भारतात इंग्रजीला अवाजवी महत्व दिल्या जाते अस मला वाटत. सगळ्या विद्यार्थ्यांनाच काय तर त्यांच्या पालकांना सुद्धा इंग्रीजीची भीती वाटते.
शहर ,निम शहर ,इथे ठीक पण ग्रामीण भागात इंग्रजीला फार घाबरताना दिसतात सगळे .पूर्वी काळी तर तोडकी मोडकी इंग्रजी येत असलेल्या व्यक्तीला गावाकडे सुधा जणू काही मोठा साहेब आहे अशी वागणूक मिळे. मुळात इंग्रजी हि सुद्धा इतर भाषांसारखी आहे . उलटपक्षी तिच्या अधिक वापराने ती अधिक समृध्द अन पक्की होत जाते तशी तिची मनात असलेली भीती सुद्धा नाहीशी होते . अलीकडच्या काळात भारतात शिक्षणासाठी मराठी माध्यम कि इंग्रजी माध्यम यावर बरीच उलट सुलट चर्चा अन पालकांमध्ये बर्याच मोठ्या प्रमाणावर संभ्रम असलेला दिसून आला .त्या स्वत याच एक जिवंत उदाहरण आहे. माझ्या मुलाला मी कुठल्या माध्यमात शिक्षण द्यावे याबद्दल मी स्वत सुरवातीला खूप संभ्रम अवस्थेत होती. एक वर्ष इंग्रजी माध्यम एक वर्ष मराठी माध्यम अश्या दोन्ही माध्यमचा अनुभव मी घेतला आहे .त्यानंतर योग्य तो निर्णय त्यांना घेता आला.
आपल्याकडे इंग्रजी या विषयला लहानच काय तर भल्या भल्या लोकांना घाबरताना त्यांनी पाहिलाय . मोठ मोठ्या लोकांची इंग्रजी बोलताना बोबडी वळताना मी पाहिलंय पण मला वाटत यामागे इंग्रजी या विषयाचा असलेला फोबिया आहे . मुळात प्राथमिक शिक्षण घेताना तुम्हाला प्राथमिक विषय शिकवणारे तुमचे शिक्षक आणि तुमचे पालक ,भाऊ ,बहिण ,एकूणच तुमच्या आजूबाजूला असलेले वातावरण हे तुमच्या मनात त्या विषयीचे भाव किवा समज निर्माण करत असतात. समजा एक मुलगा आहे आठ वर्षांचा तो आता तिसरीत असेन . दुसरीत असताना त्याला EVS या विषयला शिकवणारे त्याचे शिक्षक हे NON महाराष्ट्रीयन होते त्यामुळे त्यांना फारस हिंदी बोलता येत नाही मराठी तर नाहीच नाही.
नेमके तेच शिक्षक त्याला आता इंग्रजी या विषयाला लाभले आहेत .गेल्या वर्षी त्याला आलेल्या अनुभवानुसार ते सतत इंग्रजी याच भाषेत बोलतात आणि ते बर्यापैकी त्याच्या डोक्यावरून जाते .त्याला जेव्हा कुठल्या विषयला कोण शिक्षक हे माहित झाले त्यावेळी त्याची पहिली प्रतिक्रिया हीच असणार कि आता मला काहीही समजणार नाही .म्हणजे त्याला हळू हळू इंग्रजी या विषयच फोबिया व्हायला सुरवात होतेय .त्याकडे वेळीच आणि नेमक लक्ष दिले जायला हवे . अर्थात कुठल्याही चांगल्या गोष्टीच्या सुरुवातीला कधीही उशीर होत नाही .त्यामुळे तुम्ही तुमच्या मनातली भीती नाहीशी करून शिकण्यासाठी कधीही सुरवात करू शकतात . इंग्रजी या विषयाच्या काही रंजक गोष्टी आपण जाणून घेवूया .
१.इंग्रजी हि जगातील सगळ्यात जास्त बोलली जाणारी तिसरी भाषा आहे
२.जगात अंदाजे ३६०-४०० मिलियन लोक आहेत जे स्थानिक बोली म्हणून इंग्रजी या भाषेचा वापर करतात .
३.१.७५ बिलियन म्हणजे साधारण ४ पैकी १ मनुष्य इंग्रजी भाषेचा वापर करतात.
४.जगातल्या ६७ देशांनी इंग्रजीला व्यावसायिक भाषेचा दर्जा दिलाय .
५.जगात १२ मिलियन इंग्रजी या विषयाचे शिक्षक आहेत जे इंग्रजी वेगवेगळ्या स्तरावर अन माध्यामतून शिकवत असतात
६.१,७१,४७६ प्रचलित असलेले ,४७,१५६ अप्रचलित असलेले ,आणि ९,५०० व्युत्पन्न (DERIVATIVE WORDS) शब्द OXFORD ENGLISH डिक्शनरी मध्ये आहेत .
७.भारतात जवळजवळ १०० मिलियन लोक इंग्रजी बोलतात .
८.संपूर्ण इंग्रजी भाषेच्या ११% शब्द केवळ E या अक्षरापासून सुरु होतात .
९.सगळ्यात छोटा ,सगळ्यात जुना आणि सगळ्यात जास्त वापरात असणारा इंग्रजी शब्द म्हणजे “I”
१०.इंग्रजी या भाषेतलं सगळ्यात छोट वाक्य म्हणजे “I AM”.
११.इंग्रजीतला सगळ्यात मोठा आणि एकही अक्षर पुन्हा नसलेला शब्द म्हणजे “UNCOYRIGHTABLE”
१२.दर वर्षी साधारण १००० नवीन शब्द OXFORD डिक्शनरी मध्ये ONLINE भर पडत असते .
१३.SKIES (पायलट)साठी इंग्रजी हि कार्यालयीन कामकाजाची भाषा म्हणून मान्यता प्राप्त आहे .सगळे पायलट इंग्रजी हीच भाषा आंतरराष्ट्रीय FLIGHTS मध्ये बोलत असतात .
१४.इंग्रजी मध्ये असे खूप असे शब्द आहेत जे मुळात इंग्रजीचे नाहीत .त्यांना इतर भाषेमधून इंग्रजी मध्ये घेण्यात आलाय उदाहरणार्थ : CAFE, BALLET,GENRE,KINDERGARTEN इत्यादी.
इंग्रजीची सगळ्यात मला आवडणारी गोष्ट म्हणजे तिच्यात फार व्याकरण नसत जितक मराठी किवा इतर तत्सम भाषांना आहे . तिच्यात व्याकरण आहे पण बोलताना जी इंग्रजी बोलली जाते त्यात फार व्याकरणावर जोर देऊन किवा अचूक व्याकरण लागत नाही .त्यामुळे तिच्याविषयीच चिंता सोडा आणि जशी जमेल तशी मोडकी तोडकी का होईना आजपासून इंग्रजी बोलायला सुरवात करा.असे त्या म्हणतात की
The only thing we have to fear is , fear itself – Franklin D Roosewelt .
सुवर्णा भदाणे.