Tuesday, September 27, 2022

कुटुंब वत्सल नगराध्यक्षा सौ. साधनाताई महाजन…..

- Advertisement -

यशस्वी पुरुषाच्या यशामागे स्त्रीचा मोठा हात असतो असे म्हणतात ना तेच  नगराध्यक्षा असलेल्या सौ. साधनाताई महाजन यांनी सिद्ध करून दाखविले आहे. गिरीष भाऊ आमदार होण्यापूर्वी जि. प. सदस्य होण्याचा मान त्यांना मिळाला. कौटुंबिक जबाबदारी सांभाळून राजकारण व समाजकारण करताना त्यांनी कधी घराकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही.हे तितकेच खरे.

- Advertisement -

जामनेर तालुक्यातील पळासखेडे बुद्रुक,  या छोट्याश्या गावात जन्म घेतलेल्या सौ.साधनाताई महाजन यांचे प्राथमिक शिक्षण गावात व माध्यमिक शिक्षण जामनेरला झाले. माहेरी कोणतीही राजकीय वारसा व पार्श्वभूमी नव्हती. लग्नानंतर साधनाताईंनी आग्रहाखातर  जिल्हा परिषदेची निवडणूक लढविली आणि त्या विजयी सुद्धा झाल्या.आणि आमदार असलेल्या पतींना त्यांच्या सामाजिक कामाचा मोठा आधारच मिळाला. नेहमीच आपल्या असलेला साधेपणा साधनाताईंच्या वागण्यातून दिसत असतो. ताईंकडे महिला सह कोणीही आपली समस्या घेऊन आल्यानंतर त्यांनी ते नेहमीच त्यांच्या परीने सोडवण्याचा प्रयत्न करत असतात.

- Advertisement -

- Advertisement -

ग्रामीण भागात महिलांचे संघटन वाढविण्यात त्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. जामनेरसह ग्रामीण भागात मकर संक्रातीला हळदीकुंकवाच्या माध्यमातून त्यांनी महिलांचे मेळावे घेऊन त्यांचेशी त्यांनी हितगुज केले व या माध्यमातून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयन्त केला.

जामनेरच्या नगराध्यक्ष पदाची  त्यांचेवर तिसऱ्यांदा जबाबदारी आली. आ.गिरीश महाजन यांच्या सहकार्याने त्यांनी पालिकेच्या माध्यमातून विविध योजना राबविल्या.तसेच जामनेर शहरांमध्ये शहरातील विविध मंगल कार्यालय तसेच रस्त्यांची कामे गटारांची कामे जणू काही त्यांनी कामांचा सपाटाच लावला. काही कामे पूर्णत्वास झालेले असून काही कामे प्रगतिपथावर आहे. तसेच २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी स्वतःच्या खांद्यावर प्रचाराची धुरा घेतली व  विजय सुद्धा मिळवून दिला.

राजकारण व समाजकारण करीत असताना श्रेया व प्रियाताई या दोन्ही मुलींना चांगले संस्कार देऊन त्यांना उच्च शिक्षित केले. राजकारणात असून देखील कधीही त्यांनी विधायक कामात राजकारण येऊ दिले नाही हीच त्यांची जमेची बाजू म्हटली पाहिजे. अश्या नेहमीच आपल्या चेहऱ्यावरील स्मित हास्य व सर्वांच्या समस्या जाणून घेणाऱ्या जामनेर नगरीचा लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ साधनाताई महाजन यांना वाढदिसाच्या  मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा….

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या