जळगाव – नाविण्यपूर्ण योजनेतून जिल्ह्यातील सात लाभार्थ्यांना सन 2017-18 या वर्षात 1 हजार मासंल कुक्कुट पक्षी संगोपन योजनेतंर्गत 8 लाख 43 हजार 750 रुपयांच्या धनादेशाचे वाटप आज जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले.
सन 2017-2018 या वर्षात नाविण्यपूर्ण योजनेतंर्गत जिल्ह्यातील सात लाभार्थीनी शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार 1 हजार मासंल कुक्कुट पक्षी संगोपन यासाठी पक्षीगृहाचे बांधकाम 40 दिवसांचे आत केलेले आहे. अशा लाभार्थ्यांना शासकीय अनुदानाचा देय आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी, जळगांव यांचे अध्यक्षतेखालील जिल्हा निवड समितीने निवड केलेल्या सात लाभार्थ्यांना शासकीय अनुदानाच्या धनादेशाचे वाटप आज जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एस. जे. गायकवाड, जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पी. एस. इंगळे, सात तालुक्यांचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती व कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
या बैठकीत खुल्या प्रवर्गातून जिल्ह्यातील प्रकाश बाबुराव पाटील, रा. भोरटेक, ता. भडगांव, श्री. प्रविण प्रकाश पाटील, रा. म्हसावद, ता. जळगांव, श्रीमती शेंवताबाई आनंदा पाटील, निमखेडी, ता. मुक्ताईनगर, सुरेश बाबुराव पाटील, रा. सारवे, ता. धरणगांव, . गुलाबसिंग चंद्रसिंग पाटील, रा. जळू, ता. एरंडोल, संगिता राजेंद्र बारी, रा. शेंदूर्णी, ता. जामनेर यांना प्रत्येकी 1 लाख 12 हजार 500 रुपयांचा तर श्रीमती संगिता तुकाराम अढांगळे, रा. विटवा, ता. रावेर यांना अनुसूचित जाती प्रवर्गातून 1 लाख 68 हजार 750 रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.