कुंभार खेडा, चिनावल शिवारात सीएमव्हीमुळे केळी बाग उपटून फेकल्या

0

चिनावल, ता.रावेर (वार्ताहर) : कुकबर मोझेक व्हायरस (सी.एम.व्ही व्हायरस) चां प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून कुंभार खेडा, चिनावल परिसरात ही या व्हायरसने अनेक केळी बागांवर आक्रमण केल्याने शेतकऱ्यांना नवीन लागवड केलेले केळी बाग फेकून द्याव्या लागत आहे.

गेल्या काही दिवसांपासून केळी पट्ट्यात सी .एम.व्ही व्हायरस मुळे नविन लागवड केलेली रोपे पिवळे पडून करपत आहे. तसेच खोडाचा पोगा च सडत असल्याने पूर्ण खोड च उपटून फेकावे लागते केळी बागांमध्ये यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसत असल्याने संपूर्ण केळी बागाच्या बागा शेतकऱ्यांना फेकून द्याव्या लागत असल्यामुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसानी ला सामोरे जावे लागत आहे.

गेल्या ३ ते ४ दिवसांत अनेकांनी केळी बागा उपटून फेकल्या कुंभार खेडा शिवारातील राजेश ( डिगा ) महाजन यांनी तसेच वडगाव शिवारात तुषार पाटील,चिनावल शिवारात सुनील बोंडे यांनी या व्हायरस मुळे संपूर्ण केळी बागा उपटून फेकल्या आहे. या मुळे सदर शेतकऱ्यांचे तसेच या शिवारात सर्वच शेतकऱ्यांच्या केळी बागांवर यांचा परिणाम झाला आहे. संबंधित कृषी व महसूल विभागाने सरसकट पंचनामे करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई ची तरतूद करावी अशी केळी पट्ट्यात मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.