जळगाव । प्रतिनिधी
येथील दैनिक जनशक्ती चे संचालक,मालक कै. कुंदन ढाके सिद्धिविनायक ग्रुप, पुणे यांचे हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने आज सकाळी पहाटे अकाली निधन झाले.
नेहमी प्रमाणे सकाळी फिरायला गेलेले असतांना त्यांना हृदय विकाराचा तीव्र धक्का आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
पिंपरी-चिंचवड परिसरात नेहमी प्रमाणे सकाळी फिरायला गेलेले असतांना ते चक्कर येऊन खाली पडले. यावेळी हृदय विकाराचा तीव्र धक्का आला, त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
कुंदनदादा ढाके यांचे पार्थिव भुसावळला त्यांच्या राहत्या घरी आणले जाणार असून भुसावळ येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
अत्यंत दुःखद आणि मनाला चटका लावून जाणारी दुर्दैवी घटना
*लोकशाही परिवारातर्फे भावपुर्ण आदरांजली