महाजनांच्या आठवणीने आ.खडसे भावनिक
जळगाव : विधानसभेतून मला निलंबित केलं होतं, तेव्हा ‘कुंकवाविना सुवासिनीची कल्पना करवत नाही, तशी खडसेंविना विधानसभेची कल्पना करता येत नाही’ असं वक्तव्य भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांनी एका सभेत केलं होतं, अशी आठवण भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी जागवली.
ज्या वेळेस मला विधानसभेने निलंबित केलं होतं, त्यावेळेस एका सभेत प्रमोद महाजन म्हणाले होते, की ‘विधानसभेतला नाथाभाऊंचा आवाज संपूर्ण महाराष्ट्राला आवडतो. विधानसभेने एकनाथ खडसे यांना निलंबित केले म्हणजे ”कुंकवाविना सुवासिनीची कल्पना सहन करता येत नाही” तसेच नाथाभाऊविना विधानसभा ही कल्पना मला सहन होत नाही’ अशी आठवण एकनाथ खडसे यांनी सांगितली. भुसावळ विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय सावकारे यांच्या प्रचारासाठी आ.खडसे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.