किरकोळ भांडणातून पती घरुन निघुन गेला ; पत्नीची पो.स्टे.ला फिर्याद

0

मलकापूर (प्रतिनिधी): किरकोळ भांडणातून पती घरुन निघुन गेल्याची महिलेने शहर पो.स्टे.मध्ये फिर्याद दिली आहे.शहरातील गोपालकृष्ण नगरातील सौ.पायल श्रीकृष्ण चोपडे (२६) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे पती श्रीकृष्ण सदाशिव चोपडे (३५) यांच्यासोबत दि.१८ डिसेंबर २०२० रोजी फि च्या कारणावरुन किरकोळ वाद झाला.

या भांडणातून श्रीकृष्ण चोपडे घरात कोणाला काहीही न सांगता घरातून निघुन गेले.नातेवाईकांकडे व अन्य ठिकाणी शोधाशोध करुनही ते मिळुन आले नाही.बेपत्ता श्रीकृष्ण चोपडे यांचा वर्ण गोरा असुन चेहरा गोल,केस काळे,उंची ५फुट ३इंच व मजबुत बांधा आहे.अंगात केशरी रंगाचे फुल बाहयांचे शर्ट काळया रंगाचा पॅन्ट परिधान केलेला आहे. याबाबत कोणालाही काही माहिती असल्यास मलकापूर शहर पो.स्टे.ला ०७२६२-२२२०१८ अथवा तपास अधिकारी यांना ९५८८४४०३२२  संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.