किनगाव ता.अहमदपूर | प्रतिनिधी
येथली बसस्टँड शेजारी असलेल्या मार्केट मध्ये शनिवारी रात्री 12 च्या सुमारास शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीत सहा दुकान जळून खाक झाली येथे आग ही शॉर्ट सर्किट ने लागल्याचे दुकानदार यांनी सांगितले, या लागलेल्या आगीत सुमारे अंदाजे एकूण 52 लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे दुकानदार यांच्या कडून अर्जात सांगण्यात आले, येथील शेख रफिक रजाक यांचे सुहाग बॅगल अँड ज्वेलरी दुकान अंदाजे नुकसान सहा लाख ,गोपीनाथ लक्षमन कांबळे यांचे कृष्णा फुटवेअर अंदाजे नुकसान सात लाख, व्येंकटेश हनुमंत जोशी यांचे व्येंकटेश फुटवेअर नुकसान तेरा लाख , अजीम हुसेनसाब मणियार यांचे सहारा मोबाईल शॉपी नुकसान तेरा लाख,शेख अरबाज महेबूब यांचे अरबाज पानमटेरियल नुकसान तिन लाख ,खलील गफूरखा पठाण यांचे मराठवाडा एन्टरप्रायजेस अँड इलेक्ट्रॉनिक्स नुकसान नऊ लाख ,खलील इस्माईल बागवान फळ विक्रेते यांचे सव्वा लाख रु नुकसान झाले आहे , या जळालेल्या दुकानांचा पंचनामा करण्यात आला,यावेळी सरपंच किशोर मुंडे,मंडळ अधिकारी दहिफळे,तलाठी हंसराज जाधव ,ग्रामपंचायत सदस्य धम्मानंद कांबळे,आदी जण उपस्थित होते.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.