किनगाव ता.अहमदपूर | प्रतिनिधी
येथे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी आणि देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने अभिवादन करण्यात आले.ग्रामपंचायत मध्ये सरपंच किशोर मुंडे यांच्या हस्ते पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी ग्रामविकास अधिकारी आर जी कांबळे,ग्रामपंचायत सदस्य धम्मानंद कांबळे,दयाराम हंगे,मेघराज चावरे,तर जाकेर भाई मित्र मंडळाच्या वतीने सुद्धा जयंती निमित्ताने अभिवादन करण्यात आले यावेळी मित्र मंडळाचे अध्यक्ष जाकेर कुरेशी, गोरख भुसाळे, शेटीबा शृंगारे, त्रिशरण वाघमारे, मोहसीन शेख,अक्रम शेख,एजाज पठाण,अनसार तांबोळी,जुबेर पठाण आदीजन उपस्थित होते.