बोदवड (प्रतिनीधी) : – तालुक्यातील नाडगाव येथील ग्रामदेवता असलेल्या छोट्या मंदिरावर कित्येक वर्षापासून ग्रामस्थांचे दुर्लक्ष होत होते.या पार्श्वभूमीवर गावातील शिरीष पाटिल यांनी स्वखर्चातून तसेच ग्रामस्थांची मदत घेत मंदिराचा जिर्णोद्धार केला. मंदिराला ओटा,सुसज्ज देऊळ व मंदिर परिसरात वृक्षारोपन करण्यात आले आहे. पुर्वजांपासून चालत आलेल्या परंपरेला जोपासण्यासाठी भाड्याच्या घरात राहणार्या व्यक्तीने प्रयत्न केल्याबद्दल गावांतून शिरीष पाटिल यांचे कौतूक होत आहे.
गावातएखाद्याकडे लग्न असल्यास मुलगा किंवा मुलगीच्या हस्ते नउ दिवसां अगोदर या ग्रामदेवतेची पुजा करतात.या ग्रामदेवतेचे नाव मेस्को माय असे असून महाकालीचा दुसरा अवतार असल्याचा थोडक्यात इतिहास ज्योतीषी चंद्रकांत जोशी यांनी सांगितला.नवरदेव हनुमंताच्या मंदिरावरुन निघाल्यावर या ग्रामदेवतेच्या पाया पडून नारळ, नागेलचे पान व सुपारी ठेवुन आमंत्रण स्वरुपात दर्शन घेतात. लग्नात येणार्या अडीअडचणी दुर होण्यासाठी प्रत्येक नवरदेव याठिकाणी थांबून दर्शन घेतो. गावातील शोभा पाटिल,ललिता पाटिल,योगीता पाटिल,सरला पाटिल,सुरेखा सोनवने,रेखा पाटिल,जया पाटिल या सात सुवासिनिंनी बांधकाम पुर्ण झाल्यावर मंदिराची पुजा केली.
यावेळी गावातील वाघ मिस्त्री यांनी कोणतीही मजूरी न घेता विनामुल्य मंदिर बांधण्यास हातभार लावला तर गावातील शिरीष पाटिल,वै राजपूत, विजू सरदारसिंग पाटील,आकाश राजपूत,भूषण पाटील, अमोल व्यवहारे, गणेश राजपूत यांचे या शुभ कामासाठी सहकार्य लाभले.

