किटकनाशकाची बेकायदेशीर व विना परवानगी

0
विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल
जळगाव-
ऑक्सीफलावर (नायट्रोबेन्झीन) या किटकनाशकाची बेकायदेशीर व विना परवानगी उत्पादन, साठवणूक व विक्री केल्यामुळे मे. स्किंडलर बायोकेमीकल, नेरी बु., ता. जामनेर आणि मे. पाटील बायोटेक प्रा. लि. जळगाव यांनी शासनाची दिशाभुल करुन फसवणुक केलेली आहे. त्यामुळे त्यांचेविरुध्द एम.आय.डी. सी.पोलीस स्टेशन, जळगाव येथे भादंवि कलम 420, किटकनाशक कायदा 1968 चे कलम 3 (के), 9, 13, 17 (1) (अे) (सी) (डी), 17 (2), 18 (1)(अे), 18(2) आणि किटकनाशक नियम 1971 मधील नियम 9,10,15,16,17,18,19 चा भंग केल्याने दोन्ही कंपनीच्या जबाबदार व्यक्तींवर सरकारतर्फे श्री. संजय पांडुरंग पाटील, किटकनाशक निरीक्षक, तथा जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, जळगाव यांनी 21 फेब्रुवारी, 2019 रोजी गुन्हा दाखल केला आहे. असे संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.