काहूरखेडा, बोहर्डा बोहर्डीत शिवसेनेचा भगवा फडकला

0

भुसावळ (प्रतिनिधी)- तालुक्यातील काहूरखेडा, बोहर्डा बोहर्डी ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. काहूरखेडा येथे शिवसेनेचे शाखा प्रमुख विनोद पाटील यांच्या पत्नी गीता विनोद पाटील यांची सरपंच पदी तर मधुकर दामोदरे यांची उपसरपंच पदी निवड झाली आहे. बोहर्डा बोहर्डी येथे रमेश पाटील सरपंच तर लक्ष्मी तोगंते यांची उपसरपंच पदी निवड झाली असून ग्रामीण भागात शिवसेनेचे आजही वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

तालुकाप्रमुख समाधान महाजन, पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे, विजय मोतीराम पाटील, सतीश शांताराम पाटील, निलेश कैलास पाटील, छबिलदास राजधर पाटील, नंदकिशोर पाटील, डिंगबर पाटील, जयराम पाटील व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामपंचायतीवर भगवा फडकविण्यासाठी तालुका उपसंघटक प्रकाश कोळी, उल्हास भारसके, किशोर कोळी यांनी मोलाची कामगिरी बजावली. निवड प्रक्रिया होताच शिवसैनिकांनी जल्लोष केला. ग्रामपंचायतीवर मिळवलेल्या यशाबद्दल रावेर लोकसभेचे संपर्कप्रमुख विलास पारकर, जिल्हाप्रमुख आमदार चंद्रकांत पाटील, उपजिल्हा संघटक विलास मुळे, उपजिल्हाप्रमुख श्याम श्रीगोंदेकर, उपजिल्हाप्रमुख प्रा.उत्तम सुरवाडे, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे, शहर प्रमुख निलेश महाजन, बबलू बऱ्हाटे यांनी अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.