काहीसा दिलासा : पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त, जाणून घ्या नवे दर

0

मुंबई : जागतिक बाजारात महिनाभरात झालेल्या कच्च्या तेलातील घसरणीचा लाभ ग्राहकांना देण्याचा निर्णय पेट्रोलियम कंपन्यांनी घेतला. तब्बल दोन आठवडे इंधन दर स्थिर ठेवल्यानंतर कंपन्यांनी आज दर कपात केली. आज देशभरात पेट्रोल १६ पैसे तर डिझेल १४ पैशांनी स्वस्त झाले.

आजच्या दर कपातीनंतर गुरुवारी मुंबईत पेट्रोलचा भाव ९६.८२ रुपये आहे. डिझेलचा भाव ८७.८१ रुपये झाला. दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ९०.४० रुपये आहे. डिझेलचा भाव ८०.८३ रुपये झाला आहे.

चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९२.४३ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८५.७३ रुपये भाव आहे. कोलकात्यात आज पेट्रोलचा भाव ९०.६२ रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ८३.६१ रुपये आहे. बंगळुरात पेट्रोल ९३.४३ रुपये असून डिझेल ८५.६० रुपये झाला आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये आतापर्यंतचा डिझेलचा सर्वाधिक ८८.९८ रुपयांचा विक्रमी दर आहे. तर पेट्रोल दर ९८.४१ रुपये आहे.

कंपन्यांनी फेब्रुवारी महिन्यात १६ वेळा इंधन दरवाढ केली होती. यामुळे काही शहरांमध्ये पेट्रोलने शंभरी ओलांडली होती. त्या १६ दिवसात पेट्रोल ४.७४ रुपयांनी महागले होते. तर डिझेलमध्ये या १६ दिवसांत झालेल्या दरवाढीने ४.५२ रुपयांची वाढ झाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.