कास्ट्राईब शिक्षक संघटनेची शालेय शिक्षण मंत्र्यांसोबत बैठक संपन्न

0

 चाळीसगाव (प्रतिनिधी) : शालेय शिक्षण मंत्री सन्माननीय वर्षाताई गायकवाड, प्रधान सचिव वंदना कृष्णा मॅडम , शिक्षण संचालक माध्यमिक दिनकरराव  पाटील साहेब, शिक्षण उपसंचालक शिंदे साहेब वरील सन्माननीय अधिकारी यांच्या सोबत सोमवार दिनांक 26/10/2020 रोजी मंत्रालय, मुंबई येथे कास्ट्रईब संघटनेचे अध्यक्ष आदरणीय कृष्णा इंगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कास्ट्रईब शिक्षक संघटनेची बैठक  संपन्न  झाली.

बैठकीत मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या समस्या, पदोन्नती, जुनी पेन्शन योजना , ग्रंथपाल बांधवांचे पटसंख्ये अभावी निर्माण होणारे प्रश्न, विनाअनुदानित बांधवांचे प्रश्न ,इयत्ता पाचवी चा वर्ग प्राथमिक शाळेला जोडल्यानंतर निर्माण होणाऱ्या समस्या ,एम एस सी आय टी संदर्भात प्राथमिक शिक्षकांमध्ये असणारे संभ्रमाचे वातावरण ,अंध अपंग युनिटच्या 77 शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा या व इतर अनेक प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली.  याप्रसंगी संघटनेचे राज्य सरचिटणीस आकाश तांबे ,कार्याध्यक्ष रवींद्र पालवे ,राज्य उपाध्यक्ष विजय जाधव , अतिरिक्त सरचिटणीस प्रभाकरजी पारवे ,  उपाध्यक्ष परशराम गोंडाने ,नाशिक विभागीय अध्यक्ष  महेश आहिरे व  संघटनेतील राज्याच्या विविध जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते .

Leave A Reply

Your email address will not be published.