निपाणे ता एरंडोल (वार्ताहर) : कासोदा गाव हे ग्रामिण भागाचे बाजारपेठ असून दिवसाकाठी शेकडो लोकांची येथे वर्दळ असते.
सध्या कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर संसर्ग रोखण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक सांगितले असतांना ज्यांनी तोंडाला मास्क किंवा रूमाल न बांधता बिनधास्त फिरणाऱ्या लोकांवर पोलिसांतर्फे ५०० रुपये तर ग्राम पंचायत तर्फे १०० असा दंड आकारला जात आहे. त्यामुळे तोंडाला मास्क किंवा रुमाल न बांधणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. बिर्ला चौकात जाण्यापूर्वी लोक एक दुसऱ्याला सावध करत आहे अरे तोंडले रुमाल बांध नहीते फुकट दंड भरशी असे म्हणत एक दुसऱ्याला सावंत करत आहेत त्यामुळे कोरोनाच्या धर्तीवर दंडात्मक कारवाई मुळे शासनाने लावून दिलेल्या नियमांचे आता नागरीकांना काटेकोर पणे पालन करावे लागत आहे.