निपाणे ता, एरंडोल (वार्ताहर) ;- सामाजिक न्याय विभाग मुंबई दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे महाराष्ट्र राज्य जिल्हा समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत गिरणाई फाउ़डेशन जळगाव संचलित श्री कुलस्वामिनी चामुंडा माता मतिमंद विद्यालय कासोदा येथे शिघ्र निदान व उपचार केंद्राचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी संदिप वाघ यांचे हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी जि,प, चे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले संस्थेचे उपाध्यक्ष सतीश बडगुजर सर संस्थेचे पदाधिकारी आदी उपस्थित होते याप्रसंगी दिव्यांग क्षेत्रात उत्तुंग असे काम केलेल्या महानुभावांच्या लुईस ब्रेल हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्या नंतर दिप प्रज्वलन करून शिघ्र निदान व उपचार केंद्राचे उद्घाटक संदिप वाघ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की ० ते६ वर्ष वयोगटातील विकासात्मक समस्या असलेल्या तालुक्यातील मुलांना चांगल्या व सुत्रबध्द पध्दतीने सेवा देण्यात येत असल्याचे सांगून शिघ्र निदान व उपचार केंद्राच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या . याप्रसंगी कार्यक्रमाचे नियोजन व यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन संस्थेचे सचिव लिना बडगूजर यांनी केले.