कासोदा ता, एरंडोल) – येथील समाजसेवक तथा पत्रकार नूरुद्दीन मुल्लाजी यांना सोलापूर येथील ड्रीम फाउंडेशनच्यावतीने ए पी जे अब्दुल कलाम राष्ट्रीय उभारणी प्रेरणा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले . यानिमित्ताने रॉयल जिम तर्फे मुख्य संचालक शेख अतिक बिल्डर मुख्तार पहेलवान, शेख निसार, मुजफ्फर अली ,मुस्ताक शायर ,निलेश अग्रवाल ,सलाम भाई, शेख जैनुल ,आदी मान्यवरांनी त्यांच्या सत्कार केला व कासोदा पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल शरद अण्णा राजपूत यांच्या वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेख भाऊ बिल्डर हे होते सूत्रसंचालन मुजाहिद खान यांनी केले तर आभार अतिक बिल्डर यांनी मानले. कार्यक्रमाला कौसर बिल्डर, मन्नान बिल्डर ,मुन्ना बिल्डर, वाहिद बिल्डर शोएब पठाण, शेख अबू दादा, जुनेद शेख ,सय्यद इश्ताक़अलीआदी मान्यवर उपस्थित होते.