Thursday, September 29, 2022

कासली ग्रामपंचायतकडून जि.प.शाळा व अंगणवाडला हॅन्ड सॅनिटायझर भेट

- Advertisement -

तळेगाव (प्रतिनिधी) जामनेर तालुक्यातील कासली येथे ग्रामपंचायतमार्फत ग्रामपंचायतला हॅन्ड सॅनिटायझर बसवून जि.प. शाळा व अंगणवाड्यांना देखील हँड सॅनिटायझर व वेडिंग डीस पोझर मशीन भेट देण्यात आले.

- Advertisement -

यावेळी गटविकास अधिकारी एन आर पाटील यांनी बोलताना सांगितले की, प्रत्येक गाव स्वावलंबी झाले पाहिजे व प्रत्येक गावाची काय गरज आहे. हे ओळखून ते त्या ठिकाणी सुरू करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. ज्या गावात जे मिळत नसेल तेथील व्यक्तीच्या माध्यमातून सुरू केले गेले पाहिजे म्हणजे गावातील व्यक्तीला गावातच वस्तू व गावाचा विकास व गावातील पैसा गावातच राहिला पाहिजे अशा प्रकारचा सर्वे करून आपलं गाव स्वावलंबी कसे करता येईल यासाठी सर्वच स्तरातील मान्यवरांनी भाग घेण्याची गरज असल्याचे ते यावेळी म्हणाले. यावेळी एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी जामनेर ईश्वर गोयर , सहाय्यक गटविकास अधिकारी के बी पाटील, अमरसिंग राठोड विस्ताराधिकारी  आदींनी मार्गदर्शन केले.

- Advertisement -

- Advertisement -

तसेच यावेळी ग्रामपंचायत कार्यालय परिसरात व जि प शाळा कसली परिसरात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी सरपंचसरपंच सौ रुपाली सुभाष पाटील , प्रदीप  पाटील उपसरपंच, ग्रामसेवक शरद घोंगडे ,भगवान पाटील  विठ्ठल  दामोदर,  धनराज  सोनवणे , राजेंद्र काळे, रामचंद्र वानखेडे ,निलेश गोरे, विजय गुलचर, युवराज बाविस्कर
अशोक मोरडे ,सविता पाटील ,उज्वला पाटील, राहुल पाटील, अमोल महाराज, दगडू पाटील उपस्थित होते.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या