काश्‍मीर समस्या सोडवण्यासाठी जगातील कोणतीही ताकद रोखू शकत नाही : राजनाथ सिंह

0

जम्मू : केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह जम्मू-काश्‍मीर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी काश्‍मीर समस्या सोडवण्यापासून जगातील कोणतीही ताकद आपल्याला रोखू शकत नाही. असे विधान केले आहे. तसेच, जर कोणाला चर्चेने प्रश्न सोडवायचे नसतील, तर ते कशा पद्धतीने सोडवायचे, हे आम्हाला चांगलेच ठाऊक आहे, असा इशारा देखील राजनाथ सिंह यांनी दिला आहे.

शनिवारी कश्मीरमध्ये विकासकामांचे उद्घाटन करताना सिंह म्हणाले की, जम्मू-काश्मीरचा प्रश्न आता लवकरच सुटेल. फुटीरवादी नेते म्हणतात की त्यांना स्वातंत्र्य हवे आहे, त्यांना पकिस्तानमध्ये जसे स्वातंत्र्य आहे तसे हवे का? ज्येष्ठ नेते फुटीरवाद्यांशी संवाद साधायला गेले परंतु त्यांनी बोलणे टाळले. आम्हाला चर्चेने प्रश्न सोडवायचे आहेत. जर कोणाला चर्चेने प्रश्न सोडवायचे नसतील तर आम्हाला चांगलंच ठाऊक आहे की, हे प्रश्न कसे सोडवायचे असतात. कश्मीर प्रश्न नक्की सुटणार. हा प्रश्न संवादाने सुटला तर ठीक अन्यथा इतरही आपल्याकडे इतरही मार्ग आहेत.  दहशतवादप्रश्नी ज्या पद्धतीने संपूर्ण इंटरनॅशनल कम्युनिटी एकत्र येत आहे, त्यामुळे काश्‍मीरसह संपूर्ण जगाला दहशतवादापासून मुक्ती मिळू शकते. काश्‍मीर खोऱ्यातील सर्व समस्यांचे निराकरण लवकरच केले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.