काश्मीरच्या शोपियन चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा

0

जम्मू-काश्मीर :- जम्मू-काश्मीरच्या शोपियन जिल्ह्यातील मोलू-चित्रगाम भागात चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे.  दरम्यान सुरक्षा पथकं आणि दहशतवाद्यांमध्ये अजूनही चकमक सुरु आहे. शोपियन जिल्ह्यातच ३१ मे रोजी झालेल्या चकमकी दोन दहशतवादी ठार झाले होते तर एक जवान जखमी झाला होता.

दोनगरपोरा भागात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रीय रायफल्स, स्पेशल ऑपरेशन ग्रुप पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांनी या भागात शोध मोहिम सुरु केल्यानंतर ही चकमक सुरु झाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.