नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरात पुन्हा ‘पुलवामा’ सदृश हल्ला घडवण्याचा कट ‘आयएसआय’ या पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेचा असल्याची माहिती समोर आली आहे. आयएसआयने काही निवडक दहशतवाद्यांना एकत्र करुन एक दहशतवादी गट तयार केला आहे. या गटाचं नेतृत्व जैश-ए-मोहम्मद या संघटनेकडे देण्यात आलं आहे. या गटाला ‘गजनवी फोर्स’ असं नाव देण्यात आलं आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, जैश, लष्कर आणि अंसार गजवत-उल-हिंद या संघटनांनी मिळून सुरू केलेला हा नवा दहशतवादी गट काश्मीरमधील भारतीय सुरक्षारक्षकांवर ‘आयईडी’ स्फोटकांनी हल्ला करण्याची शक्यता आहे. या माहितीनंतर भारतीय लष्कराकडून हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

