विवेकानंद प्रतिष्ठान संचलित काशीनाथ पलोड पब्लिक स्कूलमध्ये पूर्व प्राथमिक विभागात ”फॅन्सी ड्रेस स्पर्धा” घेण्यात आली. यात विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारची वेशभूषा परीधान करून आले होते. यामध्ये नर्सरीला फळांची, ज्युनिअर केजीला भाज्यांची व सिनियर केजीला कार्टूनची थीम देण्यात आली होती. यामध्ये मुलांनी जो वेश परिधान केला होता त्याबद्दल दोन ओळीत माहिती दिली.
या स्पर्धेचे परीक्षक सौ.अर्चना पाटील व सौ. नीलिमा शुक्ल होत्या. स्पर्धेच्या प्रमुख क्रांती वंडोळे होत्या. या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक अमित सिंह भाटिया व समन्वयिका अनघा सागडे उपस्थित होते. या स्पर्धेत बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमास शाळेतील शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

