काळीहळद देण्याच्या बहाण्याने मुंबईच्या योगाची फसवणूक

0

मुक्ताईनगर : काळी हळद देण्याच्या बहाण्याने सुनिल सखाराम गायकवाड राहणार चेंबूर मुंबई यास बोलावून फसवणूक केल्याप्रकरणी हलखेडा येथील सचिन अंजुर पवार व कुऱ्हा येथील सागर अंबादास गंगातीरे या दोघांवर मुक्ताईनगर पोलिसात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी सुनिल सखाराम गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सचिन अंजुर पवार याने त्याचे मोबाईल चे व्हाट्सअप वर युट्युब वरील काळ्या हळदीचा व्हिडिओ पाठवून ही काळी हळद गळ्यात लावल्यास तुमचे नुकसान होणार नाही आर्थिक भरभराट होईल असे खोटेनाटे सांगून त्यास एक पाव हळदीसाठी 50 हजार रुपये घेऊन मुक्ताईनगरच्या बोदवड चौफुलीवरील पुलाखाली बोलावले.

या वेळेस सचिन अंजुर पवार व सागर अंबादास गंगातीरे या दोघांनी सुनील गायकवाड याला 50 हजार रुपये दे आमचा माणूस हळद घेऊन येतो आहे असे सांगितले मात्र या गोष्टीचा सुगावा पोलिसांना लागल्यानंतर पोलिसांनी तात्काळ छापा टाकत दोघी आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान मुक्ताईनगर न्यायालय नाही दोघांना आज जामिनावर सुटका केली असून तपास पोलीस उपनिरीक्षक सुदाम काकडे करत आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.