काळजी घ्या ; जिल्ह्यात आज १२२३ नव्या रुग्णांची नोंद, १३ बाधितांचा मृत्यू

0

जळगाव : जिल्ह्यातील कोरोनाचा उद्रेक सुरूच असून गेल्या  २४ तासात तब्बल १२२३ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर १३ जणांचा बळी गेला. हे दोन्ही आकडे या टप्प्यातील विक्रमी व धडकी भरविणारे आहेत.

आजच्या रुग्ण वाढीनंतर जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ८० हजार ७८६ वर गेली आहे. त्यात ६८ हजार ९८१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. दरम्यान, आज १३ बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मृताच एकूण आकडा १५२६ वर गेला आहे.  जिल्ह्यात १० हजार २७९ रुग्ण उपचार घेत आहे

असे आढळले रुग्ण

जळगाव शहर २४८, जळगाव तालुका-१३; भुसावळ 135, अमळनेर-१५३; चोपडा-३३८; पाचोरा-०३; भडगाव-३०; धरणगाव-३१; यावल-४५; एरंडोल-२९; जामनेर-६५; पारोळा-३४; चाळीसगाव-२३; मुक्ताईनगर-२९; बोदवड-२७ आणि इतर जिल्ह्यातील ०१ असे १२२३ रूग्ण आढळून आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.