पुणे | नैऋत्य मोसमी वाऱ्याने रविवारी अनुकूल वाटचाल न केल्याने, तसेच कोरड्या हवेच्या झोतांमुळे राज्यभरात रविवार तीव्र उष्णतेचा ठरला. विदर्भ खान्देश आणि मराठवाड्यातील बहुतांश ठिकाणी कमाल तापमान चाळिशीच्या वर होते. राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपूर येथे ४५.८ अंश इतकी झाली. हवामान खात्यानुसार दोन दिवस राज्यात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट टिकून राहील. कोकणात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता अाहे.
प्रमुख शहरांतील कमाल तापमान : जळगाव ४१.५, धुळे ४१.७ नाशिक ३९.९, सोलापूर ४२.५, पुणे ४०, सातारा ४०.१, परभणी ४३.८, नांदेड ४२.५, बीड ४२.६, अकोला ४३.६, अमरावती ४३, बुलडाणा ४०.५, ब्रह्मपुरी ४५.५, गोंदिया ४३.२, नागपूर ४३.९, वर्धा ४४, यवतमाळ ४२.५.