कुऱ्हा येथील घटना ; महिला जखमी
जामनेर;- – लग्नासाठी वरणगाव येथे दुचाकीने जात असताना भरधाव येणाऱ्या कालीपिलीने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये लोहार्याचे माजी सरपंच जागीच ठार तर महिला जखमी झाल्याची घटना भुसावळ जामनेर रस्त्यावरील कुऱ्हा पानाचे येथे सकाळी घडली . अपघातात लोहारा ता. पाचोरा येथील माजी सरपंच विठ्ठल दौलत क्षिरसागर (५५) हे ठार अंगणवाडी सेविका निर्मला गणेश चौधरी या जखमी झाल्या. जखमी महिलेला जामनेर उपजिल्हा रुग्णालयात हलिवण्यात आले. याबाबत पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली आहे .